शिव प्रतिष्ठान च्या वेबसाइट

वर आपले स्वागत आहे

एक पाऊल समृद्ध जीवनाकडे

दोन शब्द ...

भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाचा मुख्य़ व्य़वसाय शेती आहे. साधारणत: आजही आपल्य़ा देशातील 68% लोक ही ग्रामीण भागात राहतात. प्रामुख्य़ाने त्यांंचा व्यवसाय शेती आहे. त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे असे म्हटले तरी फारसे वाऊगे होणार नाही.

ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार केला तर ग्रामीण भाग आजही शहरी भागाच्या खूपच खूप पाठीमागे आहे, असे म्हटले तर फारसे वाऊगे वाटू नये. कारण ग्रामिण भागातील लोकांच्या गरजा शहरी भागाच्या तुलनेत कमी असूनसुद्धा ते आपल्या आवश्यक गरजासुद्धा पूर्ण करू शकत नाहीत.

भारतातील सर्वात मोठा भाग जर ग्रामीण भागात वास्तव्य करत असेल आणि त्यातील बहुतांश लोक आपल्या आवश्यक गरजादेखील पुर्ण करू शकत नसतील तर आपण भारताचा विकास झाला असे म्हणूच शकत नाही. जोपर्यत या देशाचा कणा असणारा आणि सर्वात मोठ्या लोकसंख्येने ग्रामिण भागात वास्तव्य करणारा शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार नाही तोपर्यत भारताचा विकास झाला असे आपणास म्हणता येणार नाही.

आज या शेतकरी वर्गासमोर अनंत अडचनींंचा डोंगर तोंड वासून उभा असतो . त्याला अनेक अडचणीचा सामना मोठ्या धैर्याने करावा लागतो आणि तो करतो सुद्धा . शेतकऱ्याला शेेतीच्या मशागतीपासून ते त्याने घेतलेल्या उत्पादनापर्यत अनेक प्रकारचे खर्च असतात. मग ते बियाणे , औषध फवारणी असेल , कोळपी , खुरपणी असो किंवा काढणी आसो असे एक नाही तर ते पिक येईपर्यंत अनेक प्रकारचा खर्च सुरूवातीला करावाच लागतो . हे आपणा सर्वाना माहीत आहे हे वेगळे येथे सांगण्याची गरज नही. एवढा खर्च करून सुद्धा तेे पीक येईल की नाही हे मात्र नक्की सांगता येत नाही . कारण शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाने साथ दिली तर खरे ! कित्येक वेळी तर तयार झालेले पिकसुद्धा निसर्गाच्या अवकृपेमुळे हातात आलेले पिक जाते. एवढे करून पीक आले तर तो माल बाजारपेठेत नेल्यानंतर त्या मालाला भाव/दर काय मिळेल याचिही खात्री नाही . कारण भाव /दर त्याचा हातात नाही . या आणि अशा अनेेक कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांने उत्पादित केलेला कच्चा माल कवडीमोल किंमतीत खरेदी करून त्या कच्च्यामालाचे रूपांतर पक्क्या मालात करून भांडवलदार मात्र भरगच्च पैसा कमवत आहेत. त्यामुळे गरीब तो अती गरीब आणि श्रीमंत तो अती श्रीमंत होत चाललाआहे. हा कष्टकरी शेतकरी जो जगाचा अन्नदाता आहे, जो जगाचे उदर भरविण्याचे पुण्य कर्म करतो तो मात्र दुदैवाने उपाशी आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर त्याची सक्षम अशी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारे असे संघटनही नाही.

म्हणून जगाचा जो अन्नदाता आहे, तो उपाशी झोपला नाही पाहीजे. त्यामुळे या सर्व शेतकरी कष्टकऱ्याच्या पाठीमागे शिव प्रतिष्ठान खंबीरपणे उभे असेल असा मी आपणाश विश्वास देतो.

श्री. मदनजी रेनगडे पाटील अध्यक्ष, शिव प्रतिष्ठान तथा

शिवसेना जिल्हा प्रमुख (OBC/VJNT), परभणी

शिव प्रतिष्ठानचे थोडक्यात सामाजिक कार्यातील योगदान :-

शिव प्रतिष्ठान संस्थेची स्थापना दिनांक 29 डिसेंबर 2000 साली श्री.मदनजी रेनगडे पाटील यांनी केली. तेंव्हा पासून आज पर्यंत महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून अनेक योजना यशस्वीरीत्या राबऊन हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. ज्यामध्ये शिक्षण, साहित्य, कला, रोजगार, स्वयंरोजगार उद्योग, व्यवसाय यावर भरीव काम केले. तसेच प्रशासन आणि सामान्य जनता यातील दुव्वा बनून प्रतिष्ठानच्या पदाधीकाऱ्यां मार्फत सामान्य जनतेचे स्थानिक पातळी वरील ग्राम पंचायती पासून ते मंत्रालया पर्यंत प्रशासकिय यंत्रनेत येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या योजना योग्य लाभार्थांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाची मदत केली. महाराष्ट्रातील नैसर्गीक अपत्तीग्रस्त सामान्य सभासदांना त्यांचे जीवन पुर्व पदावर येण्यासाठी आर्थिक मदतही केली. सामान्य सभासदांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू कमी दराने उपलब्ध करून देण्यासाठी कंपणी ते ग्राहक योजनेचा वापर करणे. नवोदित कवी, लेखक यांना आपले साहित्य प्रकाशीत करण्यासाठी मदत करणे. हुशार गरीब विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केलेे. विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा घेवून त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देवून त्यांचा सन्मान केला. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या स्वत:च्या गावातच आपल्या आरोग्याची तपासणी करता यावी यासाठी वेळोवेळी ग्रामीण भागातील अनेक गावात आरोग्य शिबीर घेवून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. बेरोजगार युवक - युवतींना रोजगार मिळावा यासाठी अनेक रोजगार मेळावे आयोजित करून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सेतकऱ्यांच्या मालाला वाढीव भाव मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचे रूपांतर पक्या मालात करण्याचे प्रशिक्षण दिले. या आणि अशा अनेक योजना प्रत्यक्षात राबवूून सामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शिव प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला.