शिव प्रतिष्ठानचे थोडक्यात सामाजिक कार्यातील योगदान :

शिव प्रतिष्ठान संस्थेची स्थापना दिनांक 29 डिसेंबर 2000 साली श्री.मदनजी रेनगडे पाटील यांनी केली. तेंव्हा पासून आज पर्यंत महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून अनेक योजना यशस्वीरीत्या राबऊन हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. ज्यामध्ये शिक्षण, साहित्य, कला, रोजगार, स्वयंरोजगार उद्योग, व्यवसाय यावर भरीव काम केले. तसेच प्रशासन आणि सामान्य जनता जनता यातील दुव्वा बनून प्रतिष्ठानच्या पदाधीकाऱ्यां मार्फत सामान्य जनतेचे स्थानिक पातळी वरील ग्राम पंचायती पासून ते मंत्रालया पर्यंत प्रशासकिय यंत्रनेत येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या योजना योग्य लाभार्थांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाची मदत केली. महाराष्ट्रातील नैसर्गीक अपत्तीग्रस्त सामान्य सभासदांना त्यांचे जीवन पुर्व पदावर येण्यासाठी आर्थिक मदतही केली. सामान्य सभासदांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू कमी दराने उपलब्ध करून देण्यासाठी कंपणी ते ग्राहक योजनेचा वापर करणे. नवोदित कवी, लेखक यांना आपले साहित्य प्रकाशीत करण्यासाठी मदत करणे. हुशार गरीब विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केलेे. विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा घेवून त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देवून त्यांचा सन्मान केला. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या स्वत:च्या गावातच आपल्या आरोग्याची तपासणी करता यावी यासाठी वेळोवेळी ग्रामीण भागातील अनेक गावात आरोग्य शिबीर घेवून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. बेरोजगार युवक - युवतींना रोजगार मिळावा यासाठी अनेक रोजगार मेळावे आयोजित करून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सेतकऱ्यांच्या मालाला वाढीव भाव मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचे रूपांतर पक्या मालात करण्याचे प्रशिक्षण दिले. या आणि अशा अनेक योजना प्रत्यक्षात राबवूून सामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शिव प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला.

सन 23-24 मध्ये राबविण्यात येणाऱ्या शिव प्रतिष्ठानच्या अंदाजपत्रकातील काही निवडक योजना :

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे :

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेती आणि घरेलू वस्तू त्यांना कमी दराने उपलब्ध करून देण्यासाठी कंपणी ते ग्राहक योजनेचा वापर करून त्यांना लागणाऱ्या अवश्यक गरजेच्या वस्तू मार्केट रेटपेक्षा कमी दराने उपलब्ध करून देणे.

शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालास वाढीव भाव मिळविण्याचा प्रयत्न करणे :

शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालास वाढीव भाव मिळविण्यासाठी त्यांना प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण देवून उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचे मालाचे रूपांतर पक्क्या मालात करणे.

प्रशासकिय कामात मदत करणे :

प्रशासकिय यंत्रनेत सामान्य जनतेचे काम त्यांनी अर्ज केल्या पासून किती दिवसात झाले पाहिजे याची जी शासनाने कालमर्यादा ठरवून दिल्या प्रमाणे त्यांचे काम होत नसेल तर त्यांच्या कामात प्रतिष्ठानच्या पदाधीकाऱ्यां मार्फत मदत करणे.

मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेणे :

सामान्य जनतेचे आरोग्य चांगले, तसेच त्यांना स्वत:च्याच गावात आरोग्य तपासणी करता यावी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करणे.

प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करणे :

शेतकऱ्यांना चालना मिळावी आणि त्यांच्यात चांगल्या प्रतीचे आणि जास्तीत जास्त काढण्याची स्पर्धा लावून त्यांचा विकास साधता यावा या उद्देशाने गाव, तालूका तसेच जिल्हा स्तरावर प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांचा पुरस्कार देवून सन्मान करणे.

गरीब शेतकऱ्यांच्या मुला - मुलींना मोफत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करणे :

शेतकऱ्यांच्या मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी गरीब शेतकऱ्यांच्या मुला - मुलींना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करणे. तसेच अनेक शैक्षणिक, क्रिडा आणि संगीत स्पर्धेचे आयोजन करून त्यांना प्रमाणपत्र तसेच बक्षीस वितरण करणे.

बेरोजगार युवक - युवतींना स्वयंरोजगार निर्मितीसाठी संबंधीत उद्योगाचे प्रशिक्षण देणे :

आज कित्येकांना आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय उभा करण्याची ईच्छा असून सुध्दा ते अपुऱ्या माहितीमुळे किंवा त्या संबंधीत उद्योगाचे पुरेशे ज्ञान नसल्यामुळे ते स्वत:चा उद्योगाचे पुरेशे ज्ञान नसल्यामुळे ते स्वत:चा उद्योग उभा करू शकत नाही. अपुऱ्या माहितीने उद्योग चालू केला तर त्या उद्योगात नुकसान होण्याचाच धोका जास्त असल्यामुळे बरोजगार स्वत:चा उद्योग उभा न करता कुठेतरी मिळेल ते काम करण्यातच धन्यता मानतो. कित्येक वेळेस त्या उद्योगासाठी भांडवल कसे उभे करायचे हेही त्याला सुचत नाही. जरी उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या बीज भांडवल देणाऱ्या अनेक योजना असून सुध्दा त्या व्यक्तीला वेळेत योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे तो हताश होतो आणि आपल्या मनातले स्वप्न साकार न करता तो मिळेल ते काम करून आपली उपजजिवीका करत असतो. म्हणून त्यांचे स्वप्न शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण करता येईल.

महिलांना गृह उद्योगाचे प्रशिक्षण देवून मार्केटचे मार्गदर्शन करणे :

महिलांमध्ये कौशल्य असून सुध्दा योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि कौशल्यावर आधारीत उद्योग केल्यानंतर त्यांनी जो माल तयार केला असेल त्याला बाजारपेठ कोठे मिळेल याचे पुरेशे ज्ञान बहुतेक महिलांना नसल्यामुळे त्यांच्याकडे कौशल्य असून सुध्दा महिला उद्योगाकडे वळतांना दिसत नाहीत.

अशा महिलांना त्यांच्या कौशल्यावर आधारीत आपला स्वत:चा उद्योग करता यावा त्यांना संबंधीत उद्योगाचे प्रशसिक्षण देवून बाजारपेठेचे ज्ञान देणे तसेच कच्च्या मालाच्या मार्केटची माहिती देवून महिला स्वयंपूर्ण व्हाव्या यासाठी त्यांना पूर्ण मार्गदर्शन करणेे.