दोन शब्द...
भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. साधारणत: आजही आपल्या देशातील 68% लोक ही ग्रामीण भागात राहतात. प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय शेती आहे. त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे असे म्हटले तरी फारसे वाऊगे होणार नाही.
ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार केला तर ग्रामीण भाग आजही शहरी भागाच्या खूपच खूप पाठीमागे आहे, असे म्हटले तर फारसे वाऊगे वाटू नये. कारण ग्रामिण भागातील लोकांच्या गरजा शहरी भागाच्या तुलनेत कमी असूनसुद्धा ते आपल्या आवश्यक गरजासुद्धा पूर्ण करू शकत नाहीत.
भारतातील सर्वात मोठा भाग जर ग्रामीण भागात वास्तव्य करत असेल आणि त्यातील बहुतांश लोक आपल्या आवश्यक गरजादेखील पुर्ण करू शकत नसतील तर आपण भारताचा विकास झाला असे म्हणूच शकत नाही. जोपर्यत या देशाचा कणा असणारा आणि सर्वात मोठ्या लोकसंख्येने ग्रामिण भागात वास्तव्य करणारा शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार नाही तोपर्यत भारताचा विकास झाला असे आपणास म्हणता येणार नाही.
आज या शेतकरी वर्गासमोर अनंत अडचणींचा डोंगर तोंड वासून उभा असतो. त्याला अनेक अडचणीचा सामना मोठ्या धैर्याने करावा लागतो आणि तो करतो सुद्धा. शेतकऱ्याला शेतीच्या मशागतीपासून ते त्याने घेतलेल्या उत्पादनापर्यत अनेक प्रकारचे खर्च असतात. मग ते बियाणे, औषध फवारणी असेल, कोळपी, खुरपणी असो किंवा काढणी आसो असे एक नाही तर ते पिक येईपर्यंत अनेक प्रकारचा खर्च सुरूवातीला करावाच लागतो. हे आपणा सर्वाना माहीत आहे हे वेगळे येथे सांगण्याची गरज नही. एवढा खर्च करून सुद्धा ते पीक येईल की नाही हे मात्र नक्की सांगता येत नाही. कारण शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाने साथ दिली तर खरे! कित्येक वेळी तर तयार झालेले पिकसुद्धा निसर्गाच्या अवकृपेमुळे हातात आलेले पिक जाते. एवढे करून पीक आले तर तो माल बाजारपेठेत नेल्यानंतर त्या मालाला भाव/दर काय मिळेल याचिही खात्री नाही. कारण भाव/दर त्याचा हातात नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांने उत्पादित केलेला कच्चा माल कवडीमोल किंमतीत खरेदी करून त्या कच्च्यामालाचे रूपांतर पक्क्या मालात करून भांडवलदार मात्र भरगच्च पैसा कमवत आहेत. त्यामुळे गरीब तो अती गरीब आणि श्रीमंत तो अती श्रीमंत होत चाललाआहे. हा कष्टकरी शेतकरी जो जगाचा अन्नदाता आहे, जो जगाचे उदर भरविण्याचे पुण्य कर्म करतो तो मात्र दुदैवाने उपाशी आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर त्याची सक्षम अशी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारे असे संघटनही नाही.
म्हणून जगाचा जो अन्नदाता आहे, तो उपाशी झोपला नाही पाहीजे. त्यामुळे या सर्व शेतकरी कष्टकऱ्याच्या पाठीमागे शिव प्रतिष्ठान खंबीरपणे उभे असेल असा मी आपणाश विश्वास देतो.
श्री. मदनजी रेनगडे पाटील
अध्यक्ष, शिव प्रतिष्ठान
आमची तत्त्वे
सत्य सांगा लोकां | जरी कडू लागे | चाला नाही मागे | आला कोणं
राष्ट्रीय गौरव रत्न पुरस्कार 2025
शिव प्रतिष्ठान राष्ट्रीय गौरव रत्न पुरस्कार 2025 सादर करत आहे. हा पुरस्कार खालील क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना दिला जातो:
शिक्षण
शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवीन शिक्षण पद्धती
आरोग्य
वैद्यकीय सेवा आणि आरोग्य जागृती
पत्रकारिता
निर्भीड आणि सत्यनिष्ठ पत्रकारिता
कृषी
शेतकी नवोपक्रम आणि शाश्वत शेती
क्रीडा
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा उपलब्धी
संस्कृती
कला, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक संवर्धन
पर्यावरण
पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊ विकास
सामाजिक सेवा
समाजसेवा आणि लोककल्याण
शिव प्रतिष्ठानचे थोडक्यात सामाजिक कार्यातील योगदान
शिव प्रतिष्ठान संस्थेची स्थापना दिनांक 29 डिसेंबर 2000 साली श्री.मदनजी रेनगडे पाटील यांनी केली. तेंव्हा पासून आज पर्यंत महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून अनेक योजना यशस्वीरीत्या राबऊन हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला.
आमच्या कार्याची मुख्य क्षेत्रे
शिक्षण आणि साहित्य
- हुशार गरीब विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप
- विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा
- प्रमाणपत्र आणि बक्षिसे देवून विद्यार्थांचा सन्मान
- नवोदित कवी, लेखक यांना आपले साहित्य प्रकाशीत करण्यासाठी मदत
रोजगार आणि स्वयंरोजगार
- हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे
- बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावे आयोजित करणे
- स्वयंरोजगार उद्योग आणि व्यवसाय यावर काम
- कौशल्य विकास प्रशिक्षण
आरोग्य सेवा
- ग्रामीण भागातील अनेक गावात आरोग्य शिबीर आयोजन
- लोकांच्या आरोग्याची मोफत तपासणी
- ग्रामीण जनतेला गावातच आरोग्य सेवा उपलब्ध करणे
कृषी विकास
- शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव भाव मिळवून देणे
- कच्च्या मालाचे रूपांतर पक्या मालात करण्याचे प्रशिक्षण
- उत्पादनावर प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन
- आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण
आर्थिक मदत आणि योजना
- नैसर्गिक अपत्तीग्रस्त सभासदांना आर्थिक मदत
- जीवन पुर्व पदावर येण्यासाठी साहाय्य
- शासनाच्या योजना योग्य लाभार्थांपर्यंत पोहचविणे
- कंपणी ते ग्राहक योजना - जीवनावश्यक वस्तू कमी दराने उपलब्ध करणे
प्रशासकीय मदत
- प्रशासन आणि सामान्य जनता यातील दुवा
- ग्राम पंचायती पासून ते मंत्रालया पर्यंत प्रशासकिय अडचणी सोडविणे
- शासनाच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन
या आणि अशा अनेक योजना प्रत्यक्षात राबवून सामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शिव प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला.