सामाजिक कार्य
समाजाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आमचे योगदान
शिव प्रतिष्ठानचे थोडक्यात सामाजिक कार्यातील योगदान
शिव प्रतिष्ठान संस्थेची स्थापना दिनांक 29 डिसेंबर 2000 साली श्री.मदनजी रेनगडे पाटील यांनी केली. तेंव्हा पासून आज पर्यंत महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून अनेक योजना यशस्वीरीत्या राबऊन हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. ज्यामध्ये शिक्षण, साहित्य, कला, रोजगार, स्वयंरोजगार उद्योग, व्यवसाय यावर भरीव काम केले.
तसेच प्रशासन आणि सामान्य जनता यातील दुव्वा बनून प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यां मार्फत सामान्य जनतेचे स्थानिक पातळी वरील ग्राम पंचायती पासून ते मंत्रालया पर्यंत प्रशासकिय यंत्रनेत येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.
शासनाच्या योजना योग्य लाभार्थांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाची मदत केली. महाराष्ट्रातील नैसर्गीक अपत्तीग्रस्त सामान्य सभासदांना त्यांचे जीवन पुर्व पदावर येण्यासाठी आर्थिक मदतही केली.
सामान्य सभासदांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू कमी दराने उपलब्ध करून देण्यासाठी कंपणी ते ग्राहक योजनेचा वापर करणे. नवोदित कवी, लेखक यांना आपले साहित्य प्रकाशीत करण्यासाठी मदत करणे.
हुशार गरीब विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केलेे. विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा घेवून त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देवून त्यांचा सन्मान केला.
ग्रामीण भागातील जनतेला आपल्या स्वत:च्या गावातच आपल्या आरोग्याची तपासणी करता यावी यासाठी वेळोवेळी ग्रामीण भागातील अनेक गावात आरोग्य शिबीर घेवून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली.
बेरोजगार युवक - युवतींना रोजगार मिळावा यासाठी अनेक रोजगार मेळावे आयोजित करून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
सेतकऱ्यांच्या मालाला वाढीव भाव मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचे रूपांतर पक्या मालात करण्याचे प्रशिक्षण दिले.
या आणि अशा अनेक योजना प्रत्यक्षात राबवून सामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शिव प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला.
आमची तत्त्वे
सत्य सांगा लोकां | जरी कडू लागे | चाला नाही मागे | आला कोणं